डीजीटल कांदलगाव

ग्रामपंचायत कांदलगाव

आपले सहर्ष स्वागत करीत आहे

अधिक माहितीसाठी

गावाविषयी

१९७६-७७ साली पुनर्वसन झालेले व कुलदैवत – भैरवनाथ जोगेश्वरीच्या पदस्पर्शाने पावन झालेले उजनी धरणाशेजारी वसलेले व विपुल निसर्ग सौन्दर्याने नटलेले गाव म्हणजे इंदापूर तालुक्यातील कांदलगाव. या गावाची ग्रामपंचायत स्थापना २६ डिसेंबर १९९३ होऊन गावाला पुनर्वसन खात्यात कडून २८१ भूखंड मिळाले.कांदलगाव मध्ये एकूण ३५० कुटुंबे असून गावाची लोकसंख्या २०६९ आहे. शेती हा गावाचा प्रमुख व्यवसाय असून ऊस,केळी,डाळिंब हि प्रामुख्याने घेतली जाणारी पिके आहे. गावातील सर्व कुटुंबे सुशिक्षित व सधन आहेत. गावाने सरकार व लोकश्रमाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी कामे केली आहेत. ग्रा.पं.पाणीपुरवठा योजना २०१०-११ साली पुर्ण होऊन कार्यान्वित झाली .तसेच २०१३-१४ मध्ये जल शुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून प्रतितास ५००ली क्षमतेने गावाला पाणी पुरवठा मिळू लागला. २०१४ -१५ साली घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत कंपोस्ट खताच्या टाक्या बांधण्यात आल्या व गावात कचरा व्यवस्थापनाची एक नवी सुरुवात होऊन गाव कचरा मुक्तीच्या दिशेने वाटचाल करू लागला.त्याचाच परिणाम व लोक शिक्षणाच्या माध्यमातून १५ ऑगस्ट २०१६ साली गाव हगणदारीमुक्त झाले.

    ग्रा. पं. कर्यालयाचे विस्तारीकरण सन २०१५-१६ झाले व त्यातून गावाच्या नव्या कामाला सुरुवात झाली. १३ वा वित्त आयोग निधीतून गावात मुरमिकरण , अंतर्गत गटारीची कामे झाली.तसेच २०१५-१६ मध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीमध्ये रस्ते बांधकाम करण्यात आले.गावात सौरउर्जेचा २५% वापर होत असून गावात डिजिटल साक्षरतेच प्रमाण ८० % आहे.गावामध्ये लोकवर्गणीतून भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर, दत्तमंदिर, पीरसाहेब दर्गा , तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनुजाती व नवबौद्ध वस्तीमध्ये समाजमंदिर इ. कामे करण्यात आली. दि .७ नोव्हेंबर २०१७ ला विद्यार्थी दिवस, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला शाळा प्रवेशचा दिवस विद्यार्थी दिवस म्हणुन साजरा करण्यात आला . त्यानिमित्ताने शालेय साहित्त्य वाटले . तसेच दि .पं.जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने १४ नोव्हेंबर २०१७ ला. मोफत नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले .गावात दरवर्षी शिवाजी महाराज ,डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,म.गांधी .शाहू महाराज, उमजीराजे नाईक, आण्णाभाऊ साठे , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व पुण्यतिथी उत्साहात व शांतेतेत साजरी केली जाते.

ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य मंडळ